कधी बघितलंस का तिला
खळं खळ पैंजण वाजवत प्रत्येक दगडावर पाय ठेवत
बेधुंद अशी नाचत जाणारी
कधी मध्येच गिरकी घेणारी
कधी किनाऱ्यावर येते असं म्हणुन
परत डोहात सामावून जाणारी
कधी मायेने जवळ घेत
कधी रुद्र संतापात तांडव नाचणारी
सुरवाती पासून शेवट पर्यंत तुझा शोधात
तुझा बरोबर असणारी
कधी बघितलंस का तिला ……