गोधडी

एक गोधडी शिवीन म्हणते
थोडी तुझ्या कुशीची ऊब,
थोडी तुझीच स्वप्नं घेऊन.

लाल, गुलाबी, हिरवे, पिवळ्या
रंगांचारेशीम धाग्याने शिवीन.
तुझ्या शब्दातला गोडवा
घेईन त्यांत जरा पेरून मी.

काही आठवणी, काही गप्पा,
थोडे वेडे शब्द,थोडे तुझे स्पर्श
अधून मधून गुंफून,
एक गोधडी शिवीन म्हणते.

तू असलास की तुझी मिठी,
तू नसलास की ही गोधडी.
तू अस्ताना तुझ्या बरोबरचे क्षण
आणि नसताना गोधडीत अडकलेलंतुझं तूपण…

एक गोधडी शिवीन म्हणते,
थोडी तुझ्या कुशीची ऊब,
थोडी तुझीच स्वप्नं घेऊन.

Leave a comment