एक गोधडी शिवीन म्हणतेथोडी तुझ्या कुशीची ऊब,थोडी तुझीच स्वप्नं घेऊन. लाल, गुलाबी, हिरवे, पिवळ्या रंगांचारेशीम धाग्याने शिवीन.तुझ्या शब्दातला गोडवाघेईन त्यांत जरा पेरून मी. काही आठवणी, काही गप्पा,थोडे वेडे शब्द,थोडे तुझे स्पर्शअधून मधून गुंफून,एक गोधडी शिवीन म्हणते. तू असलास की तुझी मिठी,तू नसलास की ही गोधडी.तू अस्ताना तुझ्या बरोबरचे क्षणआणि नसताना गोधडीत अडकलेलंतुझं तूपण… एक गोधडी…