कधी बघितलंस का तिलाखळं खळ पैंजण वाजवत प्रत्येक दगडावर पाय ठेवतबेधुंद अशी नाचत जाणारीकधी मध्येच गिरकी घेणारीकधी किनाऱ्यावर येते असं म्हणुनपरत डोहात सामावून जाणारीकधी मायेने जवळ घेतकधी रुद्र संतापात तांडव नाचणारी सुरवाती पासून शेवट पर्यंत तुझा शोधाततुझा बरोबर असणारीकधी बघितलंस का तिला ……