
त्या दमल्या-भागल्या जीवाचा
अर्धवट पाहिलेल्या स्वप्नांचा
हरवलेल्या लहानपणीचा
जबाबदारीतून श्वास घेत जगण्याचा
त्या खुल्या मनातल्या कवितेचा
न दिसणाऱ्या अश्रूंचा
त्या वेड्या वाकड्या वळणांचा
न संपणाऱ्या डोंगरवाटेचा
त्या गुलाबाच्या कळीसारखा
मोगऱ्याच्या वनात उन्हाळ्यातल्या दुपार सारखा
तापलेल्या रानात पहिल्या पावसाच्या सरी सारखा
छोट्याशा ओढ्यात वाहत जाणाऱ्या कागदाच्या बोटी सारखा
पहाटे ऐकू येणाऱ्या जात्यावरच्या ओवीसारखा
आजीने भरवलेल्या मऊ वरणभाता सारखा
थंडीत मारलेल्या घट्ट मिठीसारखा
उबदार गोधडीत उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या
स्वप्नासारखा…