सवय

तुझ्यातला मी शोधताना
मी बऱ्याचदा हरवतो
तुझ्यात तू उरलीस का ?
हे स्वतःलाच विचारतो

Photo by Ketut Subiyanto on Pexels.com

तुझ्यातला मी, खूपदा मलाच आवडत नाही
कसा सहन करतेस सगळं, मलाच समजत नाही

तू होतीस तशी परत हो..
हे तरी कुठे म्हणवत
सवई पुढे अजून सुद्धा
प्रेम कमी पडतं

Leave a comment