तू जेव्हा पोटाशी घेतेस आणि शांतपने डोक्यावरून हात फिरवत मला बसू देतेस,
तेव्हाचा तो तुझा येणार वास आवडतो मला
खूप काही आठवत,
आपली पहिली भेट,
तुझा पहिला स्पर्श,
तुझे बोलके डोळे,
तू दिलेला आधार,
तुझं बेफिकीर जगणं,
तुझा माझा वरचा वेडा विश्वास,
गर्दीत तू धरलेला माझा हात,
मी दिलेल्या कारणांना शांतपाने मान्य करण्याचा तुझा मोठेपणा,

तू जवळ घेतलास कि जग थांबतं,
तू जवळ असलीस कि मन शांत होतं,
परत जाऊया आपण डिनरला,
तू कर ऑर्डर आज सारखं,
मी म्हणेन “मॅडम सांगतील ते आणा”
तू तशीच डोळ्याने हंस, आणि माझा आवडीचं जेवण मी न सांगता मागव,
एक एक पेग तो बंता है…
असं म्हणत चार पाच होतील,
मी माझ्या गोष्टी सांगत गुंग असीन,
तू एकशील याची खात्री आहे मला,
जेवण संपलं कि घरी येऊ,
तुला आवडते वरची खोली,
तिकडेच बसू, घे मला जवळ थोडा वेळ
तू जेव्हा पोटाशी घेतेस आणि शांतपने डोक्यावरून हात फिरवत मला बसू देतेस,
तेव्हाचा तो तुझा येणार वास आवडतो मला…..