ओंजळ…..

संध्याकाळ लांबत गेली की ती नको नकोशी वाटते
संध्याकाळच्या शक्यतांन पेक्ष्या रात्रीची शांतता सुखावते

नको नवीन उमेद, अंधारच बरा
लख्ख उजेडात फाटक्या आयुष्याची लक्तरे दिसण्यापेक्षा, चाचपडत लावलेला अंदाजच  बरा

तुझ्या रंगात रंगताना तुझी परवांगी घेणं राहून गेलं
तूझ्यात संपताना आधी तुला सांगण राहून गेलं

गेला तो काळ, राहून गेले आठवणींचे अस्पष्ट वृण
तू मात्र मोकळा झालास, माझी आठवणींनी भरून ओंजळ…..

Leave a comment