तुझं माझं असं काही नाहीये
आपलं म्हणावं असं अजून काही घडलं नाहीये
बघायची का एखादी ओळ रेखाटून
कविता एखादी होईल का रे लिहून

एक शब्द तुझा, शांत ठहराव घेऊन आलेला
एक शब्द माझा, वेड्या बेधुंद पावसात न्ह्यालेला
एक ओळ तुझी, सगळं एकत्र धरू पाहणारी
एक ओळ माझी, मोकळ्या आभाळी उंच झेप घेणारी
एक सुरुवात माझी, अजून वेडं स्वप्न जपणारी
एक सुरुवात तुझी, माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवणारी
तरी सुद्धा …. अजून तरी ..
तुझं माझं असं काही नाहीये
आपलं म्हणावं असं अजून काही घडलं नाहीये