कधी तरी….

कधी तरी तुही शोधना मला ऑफिसच्या गर्दीत,
एक कम्फर्ट कॉर्नर प्रत्येकाचा असतोच,

होऊ देना तुलासुद्धा माझी सवय,
माझ्या हसण्याची, माझ्या आवाजाची, मी देणार्‍या मनमोकळ्या शिव्यांची,

माझा डबा शेअर करतांना घे हक्काने शेवटचा घास,
आणि तुझ्या डब्यातली माझ्या आवडीची भाजी ठेव राखून थोडी,

एक मेसेज, एक मेल, एक कप चहाचा,
मग एक ऑफिसची पार्टी, आणि तोच क्षण सावरण्याचा,

कधी तरी तुही शोधना मला ऑफिसच्या गर्दीत,
एक कम्फर्ट कॉर्नर प्रत्येकाचा असतोच

Leave a comment