
कधी जखमेवर हळुवार फुंकर घालणारा तू,
कधी नखाने पुर्वी केलेल्या चुकांच्या खपल्या काढणारा तू,
कधी प्रेमाने मऊसूत वरण भात भरवणारा तू,
कधी त्याच प्रेमापोटी मला दूर सारणारा तू,
कधी जवळ घेऊन लाड करणारा तू,
कधी नाहीच आवडत म्हणून सरळ सांगणारा तू,
कधी लहान मुलासारखा हट्ट करणारा तू,
कधी बापाच्या मायेने डोक्यावर हात ठेवणारा तू,
कधी धीर देणारा तू,
कधी दुःखात ढकलणाराही तूच…